सात्री गावातील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला : सहा जणांविरोधात गुन्हा


Assassination of former Sarpanch of Satri village: Crime against six persons अमळनेर : सात्रीचे माजी सरपंच तथा भाजपचे कार्यकर्ते महेंद्र बोरसे यांच्यावर सहा जणांनी अचानक जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवार, 2 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील बाबाजी का ढाब्यावर घडली. आरोपीनी त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली आहे.

फायटरने केली मारहाण
सात्री येथील महेंद्र बोरसे हे आपल्या मित्रांसोबत बाबाजी ढाब्यावर जेवण करीत असताना अचानक सुंदरपट्टी येथील सरपंच सुरेश अर्जुन पाटील, त्यांचा मुलगा उमाकांत पाटील, रीतेश अरुण बोरसे उर्फ टिनू (शिरूड नाका), जिजाबराव पाटील, न्हानू पाटील, मल्हारी पाटील त्याठिकाणी आले व सुरेश पाटील याने त्याच्या सोबत असलेल्या लोकांना सांगितले की हा महेंद्र बोरसे याठिकाणी असून मला कायम सर्व ठिकाणी नडतो याला जिवंत सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा. त्याच बरोबर उमाकांत याने हातातील फायटरने उजव्या डोळ्यावर वार केला. तर टिनू बोरसे याने हातातील लोखंडी पाईपने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तो महेंद्र याने हातावर झेलला तर जिजाबराव पाटील यानेही लोखंडी पाईप ने खांद्यावर मारहाण केली.


वाहनाचीही तोडफोड
महेंद्र खाली पडताच न्हानू पाटील व मल्हारी पाटील यांनी काठ्यांनी पाठीवर व बरगड्यांवर मारहाण केली. उमाकांत याने हातातील 10 ग्राम ची अंगठी बळजबरीने काढून घेतली. महेंद्र च्या सोबतच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता सुरेश याने काचेची बाटली टेबलावर फोडून त्याच्या पोटात घालण्याचा प्रयत्न केला. तो महेंद्रने चुकवूंन बाहेर आला तेव्हा उमाकांत याने चारचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.यु.1234) ची लोखंडी रॉडने तोडफोड केली. मित्रांनी महेंद्र बोरसे यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारसाठी दाखल केले. दुसर्‍या दिवशी शुद्धीवर आल्यानन्तर पोलिसांनी जबाब घेतल्यावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

मंत्री मंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने जिंकला विश्वासमत ठराव 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !