Ajit Pawar अजित पवार स्पष्टच म्हणाले : फुटलेल्या नेत्यांसोबत कार्यकर्ते जात नाही


Ajit Pawar clearly said: Activists do not go with divided leaders मुंबई : शिवसेनेतून छगनराव भुजबळ फुटल्यानंतर पुढील निवडणुकीत ते सर्व जण पराभूत झाले होते. शिवसेनेचे नेते फुटले तरी कार्यकर्ते त्यांच्या सोबत जात नसल्याचा इतिहास आहे. यामुळे आता फुटलेल्या नेत्यांनी याचा विचार करून ठेवावा, असा गर्भीत इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी सभागृहात सत्ताधार्‍यांना दिला.

पक्ष सोडणारे निवडणुकीत सपशेल पडले
आजवर शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झालेत मात्र हा पक्ष सोडलेले पुढच्या निवडणुकीत पडल्याचे सर्वांनी पाहिले आहेच ! अशा शब्दांमधे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी टिकेचे बाण चालवले. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar)  यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठरावावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण केले. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, त्यांनी अतिशय चांगल्या पध्दतीत राजकीय वाटचाल केली आहे. तथापि, हे सरकार ज्या पध्दतीत सत्तारूढ झाले ते बरोबर नाही. महाविकास आघाडी आकारास येत असतांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचेच नाव होते. मात्र त्यांनी तसे सांगितले नाही. नाही तर आज तेच मुख्यमंत्री असते. तर शिवसेनेतून अनेकदा इतरांनी पक्षत्याग केला तरी हा पक्ष फुटला नाही.


अमळनेरात सेवानिवृत्त शिक्षकाकडे दिड लाखांची घरफोडी 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !