नाथवाडा भागात घरावर दगडफेक : दोघांविरोधात गुन्हा
Stone throwing at house in Nathwada Area : Crime Against Both जळगाव : तांबापूरा येथील नाथवाडा परीससरातील घरावर दगडफेक करणार्या एकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
हमीदाबी शेख तस्लीम (45, दत्त मंदीराजवळ, नाथवाडा, तांबापूरा) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 3 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पिन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अनोळखीने हमीदाबी या घरात झोपलेले असतांना घरावर दगडफेक केली. हमीदाबी व तिचे मुले बाहेर येवून पाहिले असता पिन्यासह अनोळखी एकजण दिसून आला. त्यांनी दगडफेक का करता असा जाब विचारल्याने तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी दिली व पसार झाले. रविवार, 3 जुलै रोजी दुपारी महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार नितीन पाटील करीत आहे.
