Gulabrao Patil गुलाबराव पाटील स्पष्टपणे म्हणाले : अनेक गुन्हे अंगावर घेतले तेव्हा कुठे आमदार व मंत्री झालो
गुलाबराव उवाच : हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत होऊ नये म्हणूनच वेगळा निर्णय मात्र आम्ही शिवसेनेतच : बाळासाहेब हे महापुरूष असून त्यावर कुणाचाही एकाचा हक्क नाही : चांडाळ चौकडीने आमच्या उद्धव साहेबांना चुकीच्या मार्गावर नेले
Gulabrao Patil clearly stated his role: When we committed many crimes, where did we become MLAs and ministers मुंबई : शिवसेना वाचवण्यासाठी आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वेगळा निर्णय घेतला. आम्ही बंड नव्हे तर उठाव केला असून शिवसेनेला पध्दतशीरपणे उध्वस्त करण्याचे कारस्थान होत असतांना आमच्या आमदारांचे कुणीच काहीही ऐकून घेत वेगळा निर्णय घेतल्याची भावना आमदार गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत भाषणातून व्यक्त केली. भाषण केले. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत होऊ नये म्हणूनच वेगळा निर्णय मात्र आम्ही घेतला असलातरी आम्ही शिवसेनेतच आहोत शिवाय बाळासाहेब हे महापुरूष असून त्यावर कुणाचाही एकाचा हक्क नाही, चांडाळ चौकडीने आमच्या उद्धव साहेबांना चुकीच्या मार्गावर नेले, असा घणाघातही त्यांनी (Gulabrao Patil) केला.

आम्ही बंड नव्हे तर उठाव केला आहे
माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी आज विश्वासदर्शक ठरावावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन आम्ही शिवसेनेत कार्यरत झालो. 1995 साली शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी मला जिल्हाप्रमुख केले. तेव्हा आमचे थांबण्याचे ठिकाण हे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे कार्यालय असायचे. तिथे आम्हाला दिलासा मिळायचा. आम्ही बंड नव्हे तर उठाव केला आहे. आम्ही हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. आज आमच्यावर टपरी चालवत होते म्हणून टीका होते मात्र धिरूभाई देखील पेट्रोल पंपावर कामाला होते. आमचे मुख्यमंत्री रीक्षा चालवत होते हेदेखील खरे आहे. अनेक सर्वसामान्यांना बाळासाहेबांनी आयुष्य घडविले.
अजितदादा, आम्ही शिवसेना सोडलेली नाही
आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) म्हणाले की, अजितदादा म्हणाले की, शिवसेना सोडून आलेले निवडून येत नाहीत मात्र दादा आम्ही शिवसेना सोडलेली नाही यामुळे दादा आमच्या निवडून येण्याची चिंता करू नका, असा टोला त्यांनी (Gulabrao Patil ) मारला. 55 मधून 40 आमदार कसे फुटतात ? यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते मात्र सर्व आमदार त्यांना दु:ख सांगायला जायचे. आम्हाला भेट मिळत नाही.
अनेक गुन्हे अंगावर घेतले तेव्हा कुठे झालो आमदार
आम्ही सहज आमदार झालेलो नाहीत. आम्ही अनेक गुन्हे अंगावर घेतलेत. यातून आम्ही आमदार आणि मंत्री बनलो. गेल्या दोन वर्षात अनेक बाबी घडल्या. कोरोनाच्या काळात शिंदे साहेबांनी खूप मदत केली. तिकडे आमदारांना भेटायला वेळ नाही. मात्र इकडे दिलासा मिळाला. आमच्यावर गद्दार म्हणून आरोप करण्यात आलेत. खालच्या भाषेत टीका करण्यात आली. आम्ही चार लाख लोकांमधून निवडून आलो आहोत. मनगटात जोर असल्यावरच कुणीही निवडून येतो. आमचा मुख्यमंत्री असतांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो.
तुम्हाला जायचे तर जा, असे मिळाले उत्तर
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil )म्हणाले की, फुट पडल्यानंतर 20 आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो. यावर तुम्हाला जायचे तर तुम्ही सुध्दा जा असे सांगण्यात आले. स्व.बाळासाहेब हे महापुरूष असून त्यावर कुणाचाही एकाचा हक्क नाही. आम्ही अनेकदा आमदारांची नाराजी सांगत होतो मात्र आमचे फोन सुध्दा उचलले जात नव्हते. अजितदादा यांच्यासारखे नेते कुणालाही उपलब्ध होत असले तरी आमच्याकडे तसे नव्हते. आमच्यावर शिवराळ भाषा वापरली गेली. एकनाथ शिंदे साहेब सत्तेचे भुकेले नाहीत, असेही ते म्हणाले.
उद्धव साहेबांना चुकीच्या मार्गावर नेले
गुलाबराव म्हणाले (Gulabrao Patil ) की, चांडाळ चौकडीने आमच्या उध्दव साहेबांना चुकीच्या मार्गावर नेले. त्यांनी या चौकडीला लांब करण्याची गरज आहे. तुमची माणसे तुमच्यापासून दूर गेलेली नाहीत, तर त्यांना दूर लोटले गेले आहे. आज आम्ही खूप मोठी रीस्क घेऊन बाहेर पडलो आहोत. एकाच वेळी विरोधकांसह सहकार्यांचाही सामना करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता कुणीही जळगाव जिल्ह्यात आले नाही. दुसर्या पक्षांचे नेते येत असतांना शिवसेनेचे नेते महाराष्ट्रात फिरले नाहीत. यामुळे आम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मोदीजी आणि फडणवीस यांच्यामुळे 50 आमदार असतांनाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करत असतांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रलंबीत प्रश्नांना गती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी बहुमत विश्वासदर्शक प्रस्ताव पारीत झाल्याबद्दल कौतुक केले.