Jalgaon BJ Market Chori बीजे मार्केटमध्ये दोन दुकाने फोडली : सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला
Two shops burglarized in BJ Market : Rs 2.5 lakh stolen जळगाव : गजबजलेल्या बी.जे. मार्केट परीसरातील दोन दुकानांच्या शटरचे कुलूप तोडत चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लांबवला. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. चोरट्यांनी रोकडसह सीसीटीव्ही कॅमेर्यांचा डीव्हीआर चोरुन नेल्याने चोरटे माहितगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्यापार्यांमध्ये पसरलीzघबराट
शहरातील नयरपार्क , विजय कॉलनी येथील प्रसन्न रमेशलाल जैन हे शहरातील बालगंधर्व नाट्यगृहाजवळ महेश लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीच्या प्रतीक एजन्सी नावाने दुकानात मॅनेजर म्हणून नोकरी करतात. या ठिकाणाहून पारले बिस्कीट व फॉर्चुन ऑईलची ठोक विक्री केली जाते. शनिवार, 2 जुलै रोजी दुकानात माल विक्री करुन जमा झालेली रोकड टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून सर्व कर्मचारी घरी गेले. दुसर्या दिवशी रविवार असल्याने एजन्सी उघडलेली नव्हती. दरम्यान, सोमवार, 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मॅनेजर प्रसन्न जैन हे सेल्समन रविंद्र मुरलीधर कासार यांच्यासोबत एजन्सी उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाला लावलेले कुलूप तुटलेले व दुकानाचे शटर उचकावलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.

शिवसेनेत आम्ही बंड नव्हे तर उठाव केला : गुलाबराव पाटील
डीव्हीआरही लांबवला
चोरट्यांनी प्रतीक एजन्सीत चोरी केल्यानंतर चोरट्यांनी बी. जे. मार्केटमधील सस्टेनेबल ऍग्रो कमर्शियल फायनान्स लिमिटेड कंपनी या दुकानांचे शटर उचकावून चोरी केली. या ठिकाणाहून चोरट्यांनी डीव्हीआर, राऊटर, एचपी नेटवर्क स्विच व नेटवर्क कनेक्टर असा एकूण 57 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबविल्याचे जनरल मॅनेजर नितीन मधुकर पाटील (रा. रायसोनी नगर मोहाडी रोड) यांनी तक्रारीत नमूद केले आहे.