धूम स्टाईल मोबाईल लांबवणारा चोरटा एलसीबीच्या जाळ्यात


Dhoom Style Mobile Lengthening thief LCB Net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने मोबाईल चोरट्यास अटक केली असून या माध्यध्यातून शहरातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीच्या ताब्यातून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख (रा.शिवाजी नगर हुडको, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने अन्य दोन अल्पवयीन साथीदारांसोबत चोरीची कबुली दिली आहे.

कोरोना : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात 16 बाधीत आढळले

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरटयाचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या सुचना व आदेश दिले होते. शिवाजीनगर हुडकोतील संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या हा मोबाईल चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.


यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, राहूल पाटील यांच्या पथकाने शिवाजीनगर भागातून माहिती काढून संशयित युसूफ शेख यास अटक केली. दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्हयाची संशयित युसूफ शेख याने कबूली दिली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करण्यात आला तर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बीजे मार्केटमध्ये दोन दुकाने फोडली : सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !