स्टेट बँक कॉलनीत तरुणीचा विनयभंग


Young woman molested in Jalgaon  State Bank Colony  जळगाव : 22 वर्षीय तरुणीच्या घरात अनधिकृतपणे शिरत तिचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरातील स्टेट बँक कॉलनीत घडली. या प्रकरणी एकाविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणी घरात एकटी असताना शिरला तरुण
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक कॉलनीत 22 वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 28 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास याच परीसरात राहणारा शैलेंद्र वासूदेव पाटील हा संशयीत तरुण तरुणी घरात एकटी घरात असतांना घराच्या मागच्या दरवाजातून येवून घरात शिरला व तरुणीचा हात पकडत, तु मला मारायला मुले का पाठविली ? असे म्हणून तिचा विनयभंग केला. हा प्रकार तरूणीने कुटुंबियांना सांगितला व पीडीत तरुणीसह कुटुंबियांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर मंगळवारी रात्री 10 वाजता संशयीत आरोपी शैलेंद्र वासूदेव पाटील (रा.स्टेट बँक कॉलनी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.


साकळीतील रेशन दुकानदाराचा अपघाती मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !