सोशल मीडीयावर अल्पवयीन मुलीचे बनावट खाते तयार करीत केला विनयभंग
The Minor Girl Was Molested by Creating a Fake Account on Social media पहूर : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीच्या नावाचे बनावट खाते तयार करून अश्लील मॅसेज आणि मुलींचे फोटो अपलोड करून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळातील घरफोडी प्रकरण : तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून संशयीत आरोपी रिहान मुनाफ पांडे (सुप्रिम कॉलनी, जळगाव) याने अश्लिल मॅसेज केले. त्यानंतर गावातीलच इतर तीन मुलींसोबतचा एक फोटो अपलोड करून त्यांची बदनामी करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रीहान मुनाफ पांडे (सुप्रिम कॉलनी, जळगाव) याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.
