भादली येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण


Kidnapping Of A Minor Girl From Bhadali जळगाव : तालुक्यातील भादली येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील भादली गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. याबाबत पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी, 4 जूलै रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेवून मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.


साकळीतील रेशन दुकानदाराचा अपघाती मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !