अनोळखी तरूणाचा कजगावात रेल्वेस्थानकाजवळ मृतदेह आढळला


The body of an unidentified youth was found near the railway station in Kajgaon भडगाव : तालुक्यातील कजगाव रेल्वेस्थानकाजवळ एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आहे. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन
कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खांबा क्रंमाक 346/9 जवळ मंगळवार 5 जुलै रोजी एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आला आहे. सदर घटनेची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र यांना मिळताच पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत इसमाचे अंदाजे वय 40 वर्ष, उंची – 5 फुट, रंग – काळा सावळा, शरीर बांधा – सडपातळ आहे. तसेच अंगावर हिरव्या रंगाचे फाटलेल्या स्थितीतील बनियान आहे. मयता बाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9890633435 वर संपर्क करावा असे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रातर्फे करण्यात आले आह.े या घटनेचा पुढील तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस.एम.बोरसे हे करीत आहे.


सेक्स पॉवरच्या गोळ्या अति सेवनाचा परीणाम : प्रेयसीला लॉजवर घेवून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !