Jalgaon Illegal Refilling बळीरामपेठेत घरगुती गॅसची अवैधरीत्या वाहनात रीफिलिंग : पोलिसांच्या कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त


Illegal refilling of domestic gas in Balirampeth: Police seize goods worth Rs 4 lakh जळगाव : घरगुती गॅसचा काळाबाजार करुन वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या रीफिलिंग होत असताना पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून कारवाई करीत चार लाख 15 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहरातील बळीरामपेठेतील दुर्गादेवी चौकात करण्यात आली.

सेक्स पॉवरच्या गोळ्या अति सेवनाचा परीणाम : प्रेयसीला लॉजवर घेवून गेलेल्या तरुणाचा मृत्यू 

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील बळीरामपेठेत गंगूबाई शाळेसमोर दुर्गा देवी चौकात अनधिकृतपणे काही जण वाहनांमध्ये घरगुती गॅस भरुन देत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल फुला यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळी घटनास्थळ गाठले. याठिकाणी दहा 12 जण घरगुती गॅस सिलेंडरमधून रीक्षात तसेच चारचाकी वाहनांमध्ये भरतांना रंगेहाथ सापडले. त्यानुसार पथकाने कारवाई करुन गॅस भरण्याचे मशीन, सिलेंडर तसेच इतर साहित्य असा एकूण 4 लाख 15 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या फिर्यादीवरुन नाजिक खान नईम खान पठाण, फिरोज खान सलीम खान ऊर्फ फौजी, अब्दुल रज्जाक रंगरेज, शेख सोनू एजाज, प्रकाश लक्ष्मण वारुळे, दिपक घनशाम पाटील, गणेश काशिनाथ गोवे, महादू शंकर तेलंग, दिलीप ओंकार सोनवणे, सिकंदर शब्बीर शेख, विजय देवराम सोनवणे व जितेंद्र वसंत चौधरी या 12 जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकुंभ हे करीत आहेत.

स्टेट बँक कॉलनीत तरुणीचा विनयभंग

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !