Fupnagari Youth Dies In Two-Wheeler Accident फुपनगरीच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू


Fupnagari Youth Dies In Two-Wheeler Accident जळगाव : तालुक्यातील फुपनगरीच्या 23 वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. राहुल सिध्दार्थ सोनवणे (23, फुफनगरी, ता.जि.जळगाव फुपनगरीच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू असे मृत तरुणाचे नाव आहे.

कामावर परतताना गाठले मृत्यूने
राहुल सोनवणे हा वडील, मोठा भाऊ आणि बहिण यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. राहुल हा मंगळवार, 5 जुलै रोजी कानळदा येथे कामावर गेला होता. काम आटोपून दुचाकीने घरी परतत असतांना सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरील इलेक्ट्रीक पोलवर आदळली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरीन नागरीकांनी धाव घेवून त्याला खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत असतांना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.


नातेवाईकांचा आक्रोश
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्र परिवारांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयत राहुलच्या पश्चात वडील, मोठा भाऊ धनराज आणि बहिण पूजा असा परीवार आहे.

तिघ्रे गावातून एक कोटींचा गांजा जप्त : जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांची कारवाई


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !