खडकीच्या महिलेला मारहाण : सात संशयीतांविरोधात गुन्हा
Assault On Khadki Woman : Crime Against Seven Suspects चाळीसगाव : तालुक्यातील खडकी येथील महिलेला घरासमोर येवून सात जणांनी येवून शिवीगाळ करीत लोखंडी वस्तूने डोक्यात मारून दुखापत केली तर सोन्याची पोत तोडून नुकसान केले. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांविरोधात गुन्हा
जयश्री सचिन पाटील (26, खडकी, ता.चाळीसगाव) या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 3 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महिला तिच्या घराच्या समोर उभी असतांना गल्लीत राहणारे मुरलीधर दौलत मांडोळे, भीमराव दौलत मांडोळे, सतिष दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मिनाबाई भिमराव मांडोळे, अरूणाबाई सतिष मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे (सर्व रा. खडकी, ता.चाळीसगाव) यांनी लाथा-बुक्क्यांनी महिलेला मारहाण केली तर यातील मुरलीधर मांडोळे याने हातीतील लोखंडी वस्तून महिलेच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली शिवाय महिलेच्या गळ्यांनी सोन्याची पोत तोडून नुकसान केल्याचे समोर आले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
महिलेने जखमी अवस्थेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून सात जणांविरोधात तक्रार दिल्याने संशयित आरोपी मुरलीधर दौलत मांडोळे, भिमराव दौलत मांडोळे, सतीश दौलत मांडोळे, ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळे, मीनाबाई भीमराव मांडोळे, अरुाबाई सतीश मांडोळे आणि छायाबाई मुरलीधर मांडोळे (सर्व रा.खडकी, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहे.