जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची दिली धमकी : चौघांविरोधात गुन्हा


जामनेर : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यात घडली. या प्रकरणी त्या दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्‍या इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचार करताना काढला व्हिडिटो
जामनेर शहरात वास्तव्याला असणार्‍या आणि घरकाम करणार्‍या 17 वर्षाच्या तरुणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने 2 एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी (रा.चिंचोली पिंप्री, ता.जामनेर ) याने 12 जून 2022 रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केला. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.






चौघांविरोधात गुन्हा
तरुणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर (रा.तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी (रा.चिंचोली पिंप्री, ता.जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरूणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !