कत्तलीसाठी जाणार्या दोन गुरांची सुटका : दोघांना बेड्या
Release Of Two Cattle Going For Slaughter: Both Were Handcuffed जळगाव : कत्तलीच्या उद्देशाने जाणार्या दोन गुरांची वाहतूक करतांना पिंप्राळा येथील सोमाणी मार्केटजवळ पोलिसांनी कारवाई करीत दोन गुरांची सुटका केली तर दोघांना अटक करण्यात आली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महागाईने जनता होरपळली : गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील पिंप्राळा भागातील सोमाणी मार्केट जवळून दोन गुरांना वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या सुचनेनुसार मंगळवार, 5 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सोमाणी मार्केटजवळ येवून वाहनाची तपासणी केली असता 26 हजार रूपये किंमतीच्या दोन गुरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.

दोघांविरोधात गुन्हा
प्रकरणात संजय माणिक धनगर (44, रा.मालोद, ता.यावल) आणि परशूराम पंडीत पाटील (33, किनगाव, ता.यावल) यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले असून दोन्ही गुरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी रात्री 9 वाजता पोलीस कर्मचारी सागरकुमार देवरे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी संजय माणिक धनगर (44, रा.मालोद) व परशूराम पंडीत पाटील (33, रा.किनगाव) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.