Jalgaon Suside Adult जळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या
Adult commits suicide by strangulation in Jalgaon जळगाव : 48 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गेंदालाल मिल परीसरता बुधवारी दुपारी घउली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भागवत रतन लोखंडे (48, गेंदालाल मील, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
पेंटर काम करणारे भागवत लोखंडे हे पत्नी व दोन मुलांसह गेंदालाल मिल परीसरात वास्तव्याला होते मात्र सध्या ते काही महिन्यांपासून घरीच होते. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले हे हातमजूरी करून कुटुंबाला हातभार लावत होते. बुधवार, 6 जुलै रोजी सकाळी घरातील सर्वजण कामाला निघून गेल्याने भागवत लोखंडे हे घरी एकटेच होते. त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सोनार करीत आहे.
