Shiv Sena chief Uddhav Thackeray शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले : धनुष्यबाण आपलाच


Shiv Sena chief Uddhav Thackeray मुंबई : शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार असून धनुष्यबाण आपलाच असल्याचा पुर्नउच्चार माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विरोधकांना शिवसेना फोडायची नाही, संपवायची आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी केला. बुधवारी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला.

शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे
तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणार्‍या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणं शक्य होते, तेवढं दिलं. मात्र त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.






आमदार गुलाबराव पाटील यांचा दावा : धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार !

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !