नराधम मामानेच केला भाचीवर अत्याचार
Uncle Naradham tortured his niece जगाधरी : मामा व भाचीच्या नात्याला कलंक लावत नराधम मामाने अल्पवयीन भाचीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जगाधरी कॉलनीत घडली. सुमारे अडीच महिन्यांपासून मामा दुष्कृत्य करीत होता मात्र मामाने धमकी दिल्याने भाची घाबरलेली होती मात्र पीडीतेने हिंमत करून आईला आपबिती सांगितल्यनंतर आता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी संजू वैश याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात गुन्हा
आरोपी सध्या जगाधरी झंडा चौकाजवळील लोहारण मोहल्ला येथे राहतो. आरोपींविरुद्ध 1 जुलै रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकारी गुरदियाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची मेडिकल आणि डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे.





