शेतकर्‍यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्या

बोदवडमधील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची तहसीलदारांकडे मागणी


बोदवड : बोदवड शहरात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांना त्रास होत आहे. यासाठी राष्ट्रवादीतर्फे तहसीलदार व कृषी अधीकार्‍यांकडे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.

खतांअभावी शेतकर्‍यांची धावपळ
निवेदनाचा आशय असा की, बोदवड तालुक्यातील शेतकर्‍यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारची खते उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बोदवड तालुक्यातील कोणत्याहा कृषी केंद्रावर खते उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. ही बाब लक्षात घेता आपल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा करून तत्काळ शेतकर्‍यांच्या हितासाठी व शेतकर्‍यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तीन दिवसात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी किसान सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष वामनराव ताठे, नगरसेवक भरत अप्पा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, माजी सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, मधुकर राणे, डॉ.सेलचे डॉ.काजळे, संजय वराडे, जीवन राणे, नईम खान बागवान, विजय चौधरी, किरण वंजारी, फिलाभाई राजपूत, लतीफ शेख, आनंदा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !