न्हावी येथून तरुणाची दुचाकी चोरीला
फैजपूर : न्हावी येथील चौधरी वाडा भागातून तरुणाची 40 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
चेतन अरविंद चौधरी (38, चौधरी वाडा, न्हावी) या तरुणाने 30 जून रोजी रात्री 11 वाजता त्याने त्याची दुचाकी (एम.एच.19 डी.जे.6185) घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकी लांबवली. मंगळवारी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन हे करीत आहे.
