किरकोळ वादातून चाळीसगाव तालुक्यातील तरुणाला मारहाण : सहा जणांविरोधात गुन्हा
Young man from Chalisgaon taluka beaten up over minor dispute : Crime against six persons चाळीसगाव : शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या कुटुंबियांना सहा जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरातील खडकी बायपास येथील रहिवासी ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळ (23) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. . रविवार, 3 जुलै रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर घरी असतांना त्याच भागातील रहिवासी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे (सर्व रा. खडकी बायपास) यांनी शेतातून बैलगाडी का घेवून गेला? या कारणावरून ज्ञानेश्वर मांडोळे याला बेदम मारहाण केली. यासह ज्ञानेश्वरचे काका भीमराव मांडोळे, काकू मीनाबाई मांडोळे, वडील मुरलीधर मांडोळे, आई छायाबाई मांडोळे, काका सतीश मांडोळे, काकू अरूणाबाई मांडोळे, भाऊ सचिन यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

भुसावळातील विवाहिता चारचाकी अपघातात ठार
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी ज्ञानेश्वर मांडोळे याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे (सर्व रा. खडकी बायपास, चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहे.