पेन्शन आपल्या दारी योजना प्रभावीपणे राबवा : संजय तायडे

जिल्हाधिकार्‍यांची महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात राबवण्यासाठी रावेरात बैठक


रावेर  : संजय गांधी योजनेचे अर्थसहाय लाभार्थी असलेले अनाथ, दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती विधवा महिलांना पेन्शन काढतांना श्रमासह वेळ वाया जावून पैसाही खर्च होतो. याची बचत व्हावी म्हणून ‘पेन्शन आपल्या दारी योजना’ प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना रावेरचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केल्या आहे.

संगायो कार्यालयात बैठक यशस्वी
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची महत्वाकांक्षी असलेली योजना पोष्टामार्फत पेन्शन आपल्या दारी पोहचावी म्हणून पोष्ट अधिकारी व पोष्टमन यांची सजंय गांधी योजनाच्या कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी बैठक घेतली. या बैठकीला पोष्ट मास्तर दिनेश बारी, राहुल पाटील, दिनकर हिरे, आकाश शिजवळे, पोष्ट मास्तर शांताराम महाजन, महसूल सहायक योगेश मोहिते, इंगायो महसूल सहायक अजीत टोंगळे, पुरूषोत्तम महाजन आदी बैठकीला उपस्थित होते.


अश्या देण्यात आल्या सूचना
उपस्थित पोष्ट अधिकार्‍यांनी तलाठी, कोतवाल व डाकसेवकांमार्फत जनजागृती करावी, लाभार्थी यांचे बँक खाती आधारलिंक करावे, लाभार्थींची तलाठी व पोष्ट अधिकारी यांनी गाव पातळीवर बैठक घ्यावी, संबधित लाभार्थींना कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता बँक खात्यावरील अनुदान थेट लाभार्थींना रोख स्वरुपात द्यावे अश्या अनेक सूचना बैठकीत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी पोष्ट अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !