शिंदे गटात पेटला वाद : गुलाबराव पाटलांनीच संपवली शिवसेना ; बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्याशी बोलताना आरोप ; रेकार्डींग व्हायरल


Dispute Erupts In Shinde Group : Shiv Sena Ends with Gulabrao Patil ; Rebel MLA Chimanrao Patil Accused while talking to activist ; Recording viral जळगाव : एका शिवसैनिकासोबत सेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांचे रेकॉर्डींग व्हायरल झाले असून त्यात आमदारांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत शिवसेना संपवल्याचा आरोप केला आहे. मी शिवसेनेतून बाहेर कसा जाईल, याचादेखील प्रयत्न झाल्याचा आरोप आमदार पाटल यांनी केला आहे. बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मात्र, काही दिवसांतच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये अंतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर येत आहे. दरम्यान, आ.चिमणराव पाटील यांची एका शिवसैनिकासोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

नंदुरबार हादरले : आधी बालिकेवर केला बलात्कार नंतर केली हत्या : दाम्पत्यासह चौघे जाळ्यात

तक्रारीनंतरही मिळाला नाही न्याय
माझ्या तालुक्यात शिवसेनेने काय त्रास दिला हे मलाच माहिती आहे. मी शिवसेनेत राहू नये यासाठी त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली. ते मला रोज त्रास द्यायचे, मी आमदार असूनही भिकार्‍यासारखा पक्ष श्रेष्टींकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं. पण न्याय मिळत नव्हता. मी, उध्दव ठाकरे साहेब यांची भेट घेवून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला होता. मी, 29 वर्ष शिवसेनेत आहे. या काळात माझ्याकडून एकतरी चुक झाली का? अशी ठाकरे यांना विचारणा केली. मात्र, त्यानंतरही गुलाबराव पाटलांकडून माझ्यावर होणारा अन्याय सुरुच राहिला. मला काही माहित नसतांना ते कार्यक्रम घ्यायचे. माझ्या विरोधात पोलिसांना फोन करायचे, असेही ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण आहे.


धक्कादायक ! : एरंडोल शहरात आमदार चिमणराव पाटलांचे शुभेच्छा फलक अज्ञातांनी फाडले

धक्कादायक  ! : भाषण सुरू असतानाच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर झाडल्या गोळ्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !