धक्कादायक ! : एरंडोल शहरात आमदार चिमणराव पाटलांचे शुभेच्छा फलक अज्ञातांनी फाडले
Shocking ! : MLA Chimanrao Patil’s Greeting board torn down in Erandol एरंडोल : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी लावलेले आमदार चिमणराव पाटील यांनी लावलेले शहरातील फलक अज्ञातांनी फाडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेत राजकीय बंड झाल्यानंतर सेनेत दोन गट पडले असतानाच एरंडोल शहरात आमदारांचे फलक फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शिंदे गटात पेटला वाद : गुलाबराव पाटलांनीच संपवली शिवसेना ; बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्याशी बोलताना आरोप ; रेकार्डींग व्हायरल
बॅनर्सवरील फोटोचा भाग फाडला
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांच्या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे येथे ठिकठिकाणी मोक्याच्या जागांवर मंगळवारी बॅनर्स लावले होते. मात्र आज आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अमोल चिमणराव पाटील या दोघांचे बॅनर्स वरील फोटोचा भाग फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर थोड्या वेळानंतर हे बॅनर्स काढून टाकण्यात आले. .
