MLA Eknathrao Khadse राजकीय पुर्नवसन : आमदार एकनाथराव खडसेंनी घेतली विधानपरीषद सदस्यत्वाची शपथ
Political Rehabilitation: MLA Eknathrao Khadse took oath as a member of the Legislative Council मुंबई : सुमारे पावणेतीन वर्षांनी राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. खडसे (MLA Eknathrao Khadse) राजकारणात सक्रिय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड दुणावला आहे.
धक्कादायक ! : एरंडोल शहरात आमदार चिमणराव पाटलांचे शुभेच्छा फलक अज्ञातांनी फाडले
तीन वर्षांपासून विजनवासात एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांना भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात जून 2016 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांना 2019 मध्ये उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती. तर त्यांच्या जागी तिकिट मिळालेल्या त्यांच्या कन्येचा पराभव झाला होता. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ते राजकीय विजनवासात होते. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधानपरीषद सदस्यत्वासाठी त्यांचे नामांकन करण्यात आले असले तरी राज्यपालांनी ही यादीच प्रलंबीत ठेवली होती. यानंतर जून महिन्यात झालेल्या विधानपरीषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळाली आणि ते यात सहजपणे निवडून आले. निकालानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी होऊन सत्तांतर झाले. यानंतर शुक्रवारी त्यांनी राजभवनात विधानपरीषद सदस्यत्वाची शपथ घेतली. आज एकूण 10 नवनिर्वाचीत सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथराव खडसे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या माध्यमातून पावणेतीन वर्षांनी विधीमंडळात त्यांची पुन्हा एंट्री होणार आहे.
