जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची गोळ्या झाडून हत्या
Former Japanese Prime Minister Shinzo Abe Shot Dead टोकियो : गोळीबारात अत्यवस्थ झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचे शुक्रवारी अखेर निधन झाले आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे मात्र हल्ल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. माजी पंतप्रधान शिंजो अबे जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात संबोधित करत असताना अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर शिंजो अबे जमिनीवर कोसळले होते.
अखेर शिंजो अंबे यांचे निधन
प्राथमिक माहितीनुसार, शिंजो अबे भाषण करत असताना गोळीबार झाल्यानंतर जखमी होऊन खाली कोसळले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं म्हटले आहे तसेच शिंजो अबे खाली कोसळल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्याचंही दिसून आले, असेही स्थानिक पत्रकारानं म्हटले आहे. शिंजो अबे भाषण करत असताना त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
