भुसावळ शहरातून एकाचवेळी दोन दुचाकी लांबवल्या
Two bikes were removed from Bhusawal city at the same time भुसावळ : शहरातील विविध भागात एकाचवेळी चोरट्यांनी दोन दुचाकी लांबवल्या. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाचवेळी दोन दुचाकी चोरीला
तक्रारदार शेख शकील शेख नजीर (जाम मोहल्ला, जुबेर किराणाजवळ, भुसावळ) यांच्या मालकिची 40 हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर दुचाकी (एम.एच.19 सी.ए.3659) घराजवळून तसेच 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.के.8003) राजगौंड समाज मंदिरासमोरून 6 ते 7 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबवली. 70 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी शेख शकील यांच्या तक्रारीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.
