OBC Reservation मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे विधान : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच !


Chief Minister Eknath Shinde’s big Statement: Don’t Reject Elections Without OBC Reservation ! मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरीषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रशासन कामाला लागले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच नकोच, ही आमची भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. पावसाळ्यात निवडणुका घेताना अनेक अडचणी येतात, असेही शिंदे यांनी सांगितल्याने राज्यातील निवडणुका पुढे ढकलले जातील, अशी शक्यता आहे.

भुसावळसह जिल्ह्यातील नऊ पालिकांसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक

निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेणार
पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेतल्या जाव्यात, अशी मागणी जनतेतूनही होत आहे त्यातच शनिवारच्या पत्रकार परीषदेत मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे योग्य होणार नाही. या शिवाय सध्या पाऊस आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे विधान केले आहे. ओबीसी आरक्षणाचा विचार करता निवडणूक पुढे ढकलाव्या यासाठी सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचेही त्यांनी दिल्लीतील पत्रकार परीषदेत सांगितले.


ब्रेकींग न्यूज : सरपंचांसह नगराध्यक्षांची निवड आता जनतेतून होणार ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !