Fake TC Caught In Vidarbha Express अप विदर्भ एक्स्प्रेसमध्ये अमळनेरच्या तोतया तिकीट निरीक्षकाला पकडले
Amalner’s puppet ticket inspector caught up in the Vidarbha Express भुसावळ : 12106 अप विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासून त्यांच्याकडे अवैधरीत्या वसुली करणार्या तोतया तिकीट निरीक्षकाला सतर्क यंत्रणेने पकडत त्याच्याविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज नंदकिशोर चौधरी (22, निंब, ता.अमळनेर, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्रवाशांचे तिकीट तपासताना संशय आल्याने कारवाई
अप विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उप निरीक्षक विकास साळुंखे, रामवीर सिंह, राजेश सिंह राठोड, गोपालसिंह पठारीया हे गस्तीवर असताना मनमाड रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच एक जण प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करीत असल्याचे कळताच यंत्रणेने धाव घेत संंबंधिताकडे ओळखपत्राची विचारणा केली असता संबंधित समाधानकारक उत्तर देवू न शकल्याने सीटीआय एस.बी.रॉड्रीक्स यांना विचारणा केल्यानंतर संबंधित संशयीत हा तोतया तिकीट निरीक्षक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास ताब्यात घेवून मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात 170 आयपीसी अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
