Raver Accident रावेरनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर


Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision near Raver रावेर : रावेर शहरानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी घडला. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेर शहरानजीकच्या बिजासन माता मंदिराजवळ शेख अलताप शेख इकबाल (35, इस्लामपुर, सावदा) हा दुचाकीने रावेरकडून सावदाकडे जात असतांना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेख अलताप जखमी झाला. जखमी अवस्थेत अलताप महामार्गावर पडलेला असतांना सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांनी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटीलदेखील मदतीसाठी धावून आले.

घरफोड्या करताच विमानाने पळ काढणारा हायप्रोफाईल चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !