मुक्ताईनगर तालुक्यात चुलत भावानेच केला मतिमंद बहिणीवर अत्याचार : नराधम आरोपीला अटक
Cousin tortures mentally retarded sister in Muktainagar taluka : Naradham accused arrested मुक्ताईनगर : बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात घडली. 19 वर्षीय मतिमंद तरुणीवर नात्याने चुलत भाऊ असलेल्या नराधम तरुणाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवार, 9 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी आरोपी गजानन संजय खिरोडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास मध्यरात्री अटक करण्यात आली.
घरी कुणी नसताना केला अत्याचार
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी कुटुंबियांसह राहते. शनिवार, 9 रोजी दुपारी दोन वाजता मतिमंद मुलीचे आई-वडील शेतात गेले होते. हीच संधी साधून आरोपीने मतिमंद मुलीला शेजारच्या घरात जबरदस्तीने नेत अत्याचार केला. त्यानंतर तो पसार झाला. मुलीचे आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितली. मध्यरात्री पोलिस स्टेशन गाठत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या.
