MLA Shirish Chaudhary विश्वासदर्शक प्रस्तावाला गैरहजेरी : आमदार शिरीष चौधरींसह काँग्रेसच्या नऊ आमदारांना नोटीस
Absence of no-confidence motion: Notice to nine Congress MLAs including MLA Shirish Chaudhary मुंबई : विश्वासदर्शक प्रस्तावाला गैरहजेरी प्रकरणी यावलचे आमदार शिरीष चौधरींसह काँग्रेसच्या नऊ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करण्यात आला. यात प्रस्तावाच्या बाजूने 164 तर विरोधात 99 मते पडली. यातील लक्षणीय बाब म्हणजे विरोधकांच्या काही आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली. यात काँग्रेस पक्षाचे तब्बल नऊ आमदार विश्वासदर्शक प्रस्तावाच्या प्रसंगी हजर न राहिल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात कमी मते पडली.
तेलंगणात बँक फोडत लांबवले अडीच कोटी : जामनेरच्या चोरट्याला अखेर बेड्या
फडणवीसांनी केला होता उल्लेख
याप्रसंगी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मदत करणार्या अदृश्य हातांचा आवर्जून उल्लेख केला होता. या नऊ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी दिल्लीत श्रेष्ठींकडे केली होती.

या आमदारांना बजावली नोटीस
या अनुषंगाने रविवारी पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी आणि माधवराव पाटील जवळगावकर या विधानसभा सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी चार ठिकाणी ट्रॅफीकमध्ये अडकल्यामुळे आपण चार मिनिटे लेट पोहचल्याने सभागृहात जाऊ शकलो नसल्याची माहिती दिली आहे.