भुसावळसह यावल तालुक्यात बकरी ईद सण उत्साहात


भुसावळ : भुसावळसह यावल तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना ओसरल्यानंतर यंदा दोन वर्षानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करता येत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. राज्यासह देशात शांतता नांदावी, हिंदू-मुस्लीम ऐक्य जपले जावे तसेच बळीराजाचे राज्य यावे, अशी प्रार्थना यावेळी नमाज अदा प्रसंगी करण्यात आली.

यावल तालुक्यात बकरी ईद उत्साहात
यावल : शहर व तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील चोपडा रस्त्यावर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. रविवारी सकाळपासून पाऊस असल्याने शहरातील विविध प्रार्थना स्थळांमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. चोपडा रस्त्यावरील इदगाह मैदानावर मौलाना सैय्यद समीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक नमाज अदा करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सुयोग पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, इदगाह कमिटीचे अध्यक्ष शेख हबीब शेख नसीर, उपाध्यक्ष शेख करीम शेख रज्जाक, सचिव शेख असलम शेख नबी, सहसचिव रईस खान मुक्तार खान, खजिनदार हाजी हकीम शेख अलाउद्दीन, सदस्य हाजी गफ्फार शाह, हाजी फारुक शेख, शेख इमाम शेख लाल, युसूफ खान अमानुल्ला खान, शेख अल्ताफ शेख समद, शरीफ खान सरवर खान, माजी प्राचार्य रहिम रजा, अशपाक शाह, राष्ट्रवादीचे शेख सईद, मोहसीन खान, युवक काँग्रेसचे फैजान शाह सह आदींची उपस्थिती होती.


भुसावळ देशात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना
भुसावळ : शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर जात सामूहिक नमाज अदा केली. देशात शांतता नांदावी, हिंदू-मुस्लीम एकोपा जपला जावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी एसआरपी प्लॉटून जवान, आरसीपी प्लॉटून, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्यात.

मौलानांनी दिल्या शुभेच्छा
खडका रोडवरील इदगाह मैदानावर मौलाना रेहान रजा यांनी प्रार्थना म्हणत सर्वच मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात तर जामनेररोडवरील जुन्या इदगाहव मौलाना जुल्फेकार आलम यांनी शुभेच्छा दिल्यात. खडका इदगाह मैदानावर पाच हजार पेक्षा जास्त मुस्लीम बांधव होते तर जुन्या इदगाहवर हजारापेक्षा जास्त बांधव प्रार्थनेसाठी उपस्थित होते.

भुसावळातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार : सावदा रेल्वे स्टेशन प्रबंधकाविरोधात गुन्हा 

 

अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !