MLA Eknathrao Khadse’s गिरीश महाजन बालिश ; आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली : आमदार एकनाथराव खडसेंचा जोरदार पलटवार
Girish Mahajan Childish ; Served my footwear all my life : MLA Eknathrao Khadse’s strong retaliation मुंबई : आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माजी मंत्री खडसे (MLA Eknathrao Khadse) यांच्यावर टिका करतांना ते मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, तर बाहेर आले आणि चप्पल हरवली अशी खिल्ली उडविली होती. यावरून सोडल मीडियात याबाबत बातम्या व्हायरल झाल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, गिरीश महाजन बालिश आहेत, प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले.
भुसावळातील तक्रारदाराला अश्लील व्हिडिओ पाठवून लुटले : आरोपीला हरीयाणातून अटक
दोन्ही नेते सोडत नाही टिकेची संधी
एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) या दोन्ही माजी मंत्र्यांमधील अलीकडच्या काळात आलेले वितुष्ट हे जगजाहीर आहे. दोन्ही मान्यवर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच खडसे हे आमदार बनल्यानंतर लागलीच राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडल्यामुळे सोशल मीडियात खडसे विरोधकांनी पंगतीत बसले आणि बुंदी संपली अशी त्यांची खिल्ली उडविली होती तर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील याबाबत टिका केल्यानंतर माजी मंत्री खडसे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना ‘गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, पादत्राणे हातात घेऊनच मते मागितली !’ अशा शब्दांमध्ये आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
