आधी प्रेयसीला लॉजवर आणले अन् मध्यरात्री घडले असे काही की…!
Earlier, he brought his girlfriend to the lodge and something like that happened in the middle of the night …! पुणे : प्रेमसंबंधात असलेल्या तरुणाने प्रेयसीला गोड बोलून लॉजवर आणले, रात्रभर दोघे सोबत राहिले मात्र मध्यरात्रीतून तरुणाने तरुणीचा खून करून प्रियकराने पळ काढला. ही धक्कादायक घटना पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. सकाळी रूमची साफ-सफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. दीप्ती काटमोडे (24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरीश महाजन बालिश ; आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली : आमदार एकनाथराव खडसेंचा जोरदार पलटवार
रात्रीच आणले तरुणीला लॉजवर
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते मात्र रात्री दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून खटके उडाले व संतप्त प्रियकराने या तरुणीला बाथरूममध्ये खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघड झाला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफ-सफाई करण्यासाठी लॉजचा कामगार रूममध्ये गेला. त्यावेळी त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

पसार प्रियकराचा शोध सुरू
माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. माहिती घेतल्यानंतर दिप्ती तिच्या मित्रासोबत लॉजवर रात्री आली असल्याचे समजले. पोलीसांकडून पसार झालेल्या त्या मित्राचा शोध घेतला जात आहे.
शिंदे गटातील 16 आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा : ‘तो’ पर्यंत कारवाई नाहीच