Saint Shri Gopal Chaitanya ji Maharaj पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेची तयारी
Preparations for Gurupournima at Pal Vrindavan Dham Ashram रावेर : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आली होती मात्र यंदा कोरोना ओसरल्याने सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली असून त्याचे औचित्य साधून तालुक्यातील पाल येथील वृंदावन धाम आश्रमात बुधवार, 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा माहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाममध्ये अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे आणि विद्यमान पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सनिध्यात गुरुपौर्णिमा माहोत्सव साजरा करण्यात येत आहे.
सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन
प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या समाधी दर्शनाकरीता श्री वृंदावन धाम, पाल येथे देशभरातून हजारो भाविक गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त येतात तसेच शेकडो किलोमीटरहुन चैतन्य साधक परीवाराची पाई दिंडी सुद्धा येत असते. पावसामुळे भाविकांसाठी वॉटरप्रुफ मंडपात निवास, भोजन, तसेच सत्संग मंडप, समाधी दर्शन व्यवस्था, कीर्तन, भजन, पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आरोग्य रुग्ण व्यवस्था, स्नान आदींसाठी गत महिन्याभरापासून साधक परीवार तसेच ब्रम्हचारी यांच्याकडून तयारीला वेग दिला आहे. भाविकांच्या आगमनासाठी पाल नगरी सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस तसेच इतर व्यवस्था जसे आगार, विद्युत, ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन चैतन्य साधक परीवारातर्फे करण्यात आले आहे.
