MLA Chandrakant Patil मुक्ताईनगरात स्वस्त धान्याबाबत अनागोंदी : आमदारांचे प्रांताधिकार्‍यांना पत्र


Chaos over cheap foodgrains in Muktainagar: MLA’s letter to state officials मुक्ताईनगर : तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत नागरीकांना धान्य व्यवस्थित व वेळेवर पोहोचविले जात नाही. त्यातच कुठल्याच पावत्या किंवा तशा स्वरूपाची नोंद असलेली पावती लाभार्थींना दिली जात नसल्याची तक्रारी वाढल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात भुसावळ प्रांताधिकार्‍यांना पत्र देत स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक शुक्रवार, 15 मुक्ताईनगर येथे आढावा बैठक घेण्यात यावे, असे कळवले आहे.

धान्य वितरणाबाबत अनागोंदी
शासनाने वितरण व्यवस्थेचे आखलेले धोरण शहर व तालुक्यात राबवले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून नागरीकांचे हक्काचे धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याने या संदर्भात दखल घेण्यात यावी, या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ प्रांताधिकार्‍यांना पत्र देत शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी मुक्ताईनगर येथे तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घ्यावी, असे पत्रान्वये कळवले आहे.


खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेली पसार महिला आरोपी जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !