भुसावळातील पूज्य आसाराम आश्रमात 13 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव
भुसावळ : शहरातील श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे शहरातील पूज्य आसाराममजी बापू आश्रमात बुधवार, 13 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी 10 वाजता आसारामायण पाठ, पादुका पूजा, 11.45 वाजता मध्यान संध्या, दुपारी 12.15 वाजता व्हिडिओ सत्संग, दुपारी एक वाजता महाआरती व महाप्रसाद वितरण होईल. व्यासपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.