अवमानना प्रकरण : मद्य व्यावसायिक मल्ल्याला चार महिने जेल व दंडाची शिक्षा


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अवमानना प्रकरणात मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला चार महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबत दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने विजय मल्ल्याला 4 आठवड्यांच्या आत चार कोटी डॉलर आठ टक्के व्याजासह जमा करण्याचे आदेशही बजावले आहेत. तसे न केल्यास मल्ल्याची संपत्ती जप्त करून वसूल केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अवमानना प्रकरणी निकाल
न्या.यू.यू. ललित, एस. रवींद्र भट आणि पी.एस.नरसिम्हा यांच्या पीठाने सोमवारी हा निकाल दिला. याआधी 10 मार्च रोजी न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. अवमाननेचे हे प्रकरण किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित 9,000 कोटी रुपयांहून जास्तीच्या कर्जफेडीशी संबंधित आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !