रावेरातील दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : पुन्हा दोन आरोपींना अटक


One And A Half Crore Corruption Case In Rawer : Two Accused Arrested Again रावेर : राज्यात गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील दिड कोटींच्या शौचालय गैरव्यवहार प्रकरणी रावेर पोलिसांनी नव्याने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी रात्री खिरोदा प्र.रावेर येथून सतीश वामनराव पाटील तर खिरवड येथून महेंद्र बिसन गाढे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या दहावर पोहचली आहे.

अनेकांवर कारवाई होणार
बहुचर्चित रावेरातील शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात दिवसागणिक आरोपींची संख्या वाढत आहे. सोमवारी दिवसभर येथील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचा जबाब नोंदवण्यात आला तर सायंकाळी काही बँक अधिकार्‍यांचीदेखील चौकशी तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी केली.


ब्रेकींग न्यूज : राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका जाहीर तारीखेलाच होणार

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !