कौटुंबिक वादातून भावाची केली हेत्या


The Intentions of The Brother From The Family Dispute मूर्तिजापूर : कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाची कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, 12 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो पुंडलिक नगर परीसरातील खंडूजीनाना नगरात घडली. रणधीर उल्हासिंग चव्हाण (36) असे मयताचे तर प्रितम उल्हासिंग चव्हाण असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आई-वडीलांवर केला होता मयताने हल्ला
सिरसो येथील खंडूजीनाना नगरात राहत असलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उल्हासिंग चव्हाण यांना दोन मुले आहेत. लहान मुलाला दारुचे व्यसन असल्याने तो आई – वडील व मोठ्या भावाकडे दारुसाठी नेहमी पैसे मागत असत. मंगळवारी रणधीर उल्हासिंग चव्हाण (36) हा घरी दारु पिऊन आला व आई-वडिलांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली. यावेळी घरात असलेला मोठा मुलगा प्रीतम उल्हासिंग चव्हाण हा धावून आला असता त्याच्यावरही रणधीर याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी बाजूला असलेल्या कोयत्याने प्रितमने प्रतिहल्ला केला व वार अडवण्यासाठी रणधीरने हात वर केला तेव्हा त्याचा मनगटापासून हात कटून गळ्याजवळ जोरदार वार झाला, त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.


आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
या संदर्भात ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रितम याला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, माना पोलीस स्टेशनचे कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, घनश्याम पाटील यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली.

स्वतः दिली पोलिसांना माहिती
घटना घडल्यावर आरोपी प्रितम उल्हासिंग चव्हाण याने त्याच्या हातून अशा प्रकारचे कृत्य घडल्याची माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयात फोन करुन दिल्याने ताबडतोब पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला.

भरधाव डंपरची अ‍ॅपेला धडक : किनगावातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !