घरगुती गॅसचा काळाबाजार : तरूणाला एमआयडीसी पोलिसांकडून अटक
जळगाव : घरगुती गॅस चारचाकी वाहनात अवधरीत्या भरणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलिसांनी सोमवार, ११ जुलै रोजी कारवाई कर तरुणाला अटक केली. त्याच्याकडून २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमी परीसरात घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करून काळाबाजार होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सोमवार, ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी कारवाई केली. या कारवाईत रहिमबेग हसनबेग मिर्झा (38, रा. बिसमिल्ला चौक, तांबापूरा, जळगाव) याच्याकडून १२ हजार रूपये किंमतीचे ६ घरगुती गॅसचे सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य व मशिन असा एकुण २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हास्तगत करण्यात आला. या प्रकरणी सायंकाळी पोलीस नाईक इमरान अली युसूफअली सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रहिमबेग हसनबेग मिर्झा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.
