पब्जी खेळण्यास मनाई केल्याने बोदवडमधील तरुणाची आत्महत्या : विहिरीत आढळला मृतदेह
The body of a missing youth was found in a well in Bodwad बोदवड : वडिलांनी पब्जी खेळू देण्यास मनाई केल्याचा राग आल्याने व मोबाईलवर रीजार्च करून देण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अजय सुरेश माळी (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे अजय हा तरुण 10 जुलैपासून घरातून बेपत्ता झाल्याने बोदवड पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मंगळवारी त्याचा मृतदेह विहिरीत आढळला.
विहिरीत आढळला मृतदेह
शहरातील दत्त कॉलनीमधील रहिवासी सुरेश सखाराम माळी (51) यांचा तरुण मुलगा अजय सुरेश माळी हा 10 रोजी साडेआठ वाजता घरातून काही एक न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध घेतला असता तो आढळला नाही. त्यामुळे त्याचे वडील सुरेश माळी यांनी अजय याचा शोध घेण्याकरता येथील पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. त्याचा शोध घेण्यासाठी तेही सर्वत्र फिरत होते. दरम्यान रूप नगरामधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत त्यांनी डोकावून पाहिले असता त्यामध्ये अजय याचा मृतदेह त्यांना आढळला. त्यामुळे तरुण मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस युनूस तडवी करत आहे.

पब्जी खेळण्यास मनाई केल्याने आत्महत्येची चर्चा
अजय माळी यास मोबाइलवर पब्जी गेम खेळण्याची सवय होती. ही सवय चांगली नाही. त्यामुळे हा गेम खेळू नको, असे सांगून त्याच्या वडिलांनी त्यास मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासही मनाई केली. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने असे कृत्य केल्याची गावात चर्चा आहे.
20 लाखांची खंडणी भोवली : यावल शहरातून दोघे पोलिसांच्या जाळ्यात