शिरपूर तालुक्यातील यात्रोत्सवात मंगलपोत लांबवल्या : भुसावळ तालुक्यातील चोरटी महिला जाळ्यात
Mangalpot Removed During Pilgrimage in Shirpur Taluka : Thieves Caught in Bhusawal Taluka शिरपूर : तालुक्यातील बाळदे येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या मंगळसूत्रांवर हातसफाई करणार्या भुसावळ तालुक्यातील महिलेला शिरपूर पोलिसांनी अटक केली असून दोन मंगलपोत जप्त केल्या आहेत तर दोन अल्पवयीन मुलगा व मुलीलादेखील चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
20 लाखांची खंडणी भोवली : यावल शहरातून दोघे पोलिसांच्या जाळ्यात
यात्रोत्सवात लांबवल्या मंगलपोत
शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर बाळदे येथे रविवार, 10 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भावीकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. यादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञातांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत लांबविल्या होत्या. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुसावळ तालुक्यातील महिला जाळ्यात
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस व शोध पथकाने उषा संजु काळे (25, रा.पिंपळगाव, ता.भुसावळ) या संशयीत महिलेसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 28 हजार रुपये किंमतीच्या 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगलपोत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नूतन सोनवणे, रोशनी पाटील, अनिता पावरा, शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी, गोविंद कोळी, प्रवीण गोसावी, आण्णा कोळी, मनोज दाभाडे, विनोद आखडमल, प्रशांत पवार आदींनी केली.