रीक्षातून प्रवास करणार्या तरुणाच्या खिशातून 55 हजार रुपये लांबवले
जळगाव : दुचाकी घेण्यासाठी आलेल्या तरुणाच्या खिशातून 55 हजार रुपयांची रोकड चोरट्याने रीक्षातून लांबवल्याची घटना 28 मे रोजी रात्री 7.30 वाजता घडली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील संशयितांना दुसर्या एका गुन्ह्यात अटक केली आहे.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा
या संदर्भातील बातम्या पाहिल्यानंतर फिर्यादीने रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. रुपये रमेश भाटिया (वय 32, रा. धरणगाव) यांच्या सोबत हा प्रकार घडला . ते दुचाकी खरेदी करण्यासाठी 55 हजार रुपये घेऊन 28 मे रोजी जळगावात आले. नंतर घरी जातांना तिघांनी रीक्षात त्यांचे पैसे लांबवले.
