धक्कादायक ! : अट्टल घरफोड्याने चोपडा शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतच कापल्या हाताच्या नसा


Shocking ! : Attal Uurglary Cuts The Veins Of The Hand in the Cell Of Chopda City Police Station चोपडा : देशभरात पन्नासहून अधिक घरफोड्या करणार्‍या अट्टल घरफोड्याला नंदुरबार शहरातून गुन्हे शाखेने अटक करीत चोपडा शहर पोलिसांना एका गुन्ह्यात सोपवले होते. आरोपी जिम्मी उर्फ दीपक विपीन शर्मा (29) याने चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना मंगळवार, 12 रोजी सायंकाळी धारदार वस्तूने हाताच्या नसा व गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेतह.

अट्टल आरोपीचा देशभरात धुमाकूळ
संशयित शर्मा हा नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार आहे. त्याने आतापर्यंत देशात वेगवेगळ्या 50 ठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत. 30 जून रोजी चोपड्यात त्याने भरदिवसा चार व अमळनेर येथे एक असे पाच घोरफोड्या केल्या होत्या. या गुन्ह्यात त्याने तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज लांबवला होता. या पैशातून त्याने रेल्वेने मुंबई गाठून तेथून विमानाने दिल्ली गाठली होती. अमळनेरच्या घरफोडीत तो सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असताना अमळनेर ते नरडाणा दरम्यान एका ढाब्यावरील सीसीटीव्हीत तो आढळला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून नंदुरबार येथून अटक केली होती. नंतर त्याला चोपड्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांकडे सोपवले होते. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.पंकज पाटील, डॉ.हेमंत पाटील यांनी उपचार केले. डीवायएसपी कृषिकेश रावले यांनी या घटनेची माहिती जाणून घेतली.


शिरपूर तालुक्यातील यात्रोत्सवात मंगलपोत लांबवल्या : भुसावळ तालुक्यातील चोरटी महिला जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !