वरखेडच्या तरुण शेतकर्याचा शॉक लागून मृत्यू
Young farmer of Varkhed Dies of Shock बोदवड : तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील बत्तीस वर्षीय तरुण शेतकर्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 13 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. गोपाल रामधन हडपे (32, वरखेड बुद्रुक) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
वरखेड गावात शेतकर्याच्या मृत्यूने हळहळ
गोपाल हे बुधवारी दुपारी एक वाजता आपल्या शेतात इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी विजय भास्कर हडपे यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक उद्दल चौहान करीत आहेत.
