Girna Dam मोठी बातमी : सलग चौथ्यांदा गिरणा धरण शंभर टक्के भरण्याची आशा ! आज दुपारपर्यंत होणार 80 टक्के जिवंत साठा


Big news: Hoping to fill Girna Dam one hundred percent for the fourth time in a row! 80 percent live stock by this afternoon चाळीसगाव  : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या व निम्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणार्‍या गिरणा धरणात गुरुवारी दुपारपर्यंत तब्बल 80 टक्के जिवंत साठा होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत सलग तीन वेळा धरण भरल्याचे रेकॉर्ड असल्याने यंदाच्या पावसाळ्यात सलग चौथ्यांदा धरण भरेल, अशी आशा आहे. 1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण आतापर्यंत 11 वेळा शंभर टक्के भरल्याचा इतिहास आहे.

रजेवर आलेला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी पातोंडी गावातून पसार

गिरणा काठावर सतर्कतेचे आवाहन
गुरुवारी दुपारपर्यंत गिरणा धरणात 80 टक्के जिवंत साठा होणार असून शिवाय धरणात वाढत असलेल पाण्याची आवक पाहता धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन गुरुवारी दुपारनंतर गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी गिरना नदीत सोडण्यात येणार असल्याने नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या पाण्याच्या उद्भवाप्रमाणे कमी-जास्त असणार असून सुरवातीला 20 हजार क्यूसेक इतका व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणार्‍या येवानुसार विसर्ग एक क्यूसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जळगाव व कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व यांच्या वतीने करण्यात येत आहे.


सप्टेंबर महिन्यात तीन वेळा भरले गिरणा धरण
17 सप्टेंबर 2019 रोजी गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर 16 सप्टेंबर 2020 व 30 सप्टेंबर 2021 रोजी धरण पूर्णपणे भरले होते तर यंदादेखील चौथ्यांदा सलग चौथ्यांदा धरण भरण्याचा विक्रम होण्याची आशा आहे.

दृष्टिक्षेपात गिरणा धरण
स्थळ – नांदगाव पासून वीस किलोमीटर वर
उभारणी – 1969 (1955 मध्ये बांधकामाला सुरुवात व 1969 मध्ये पूर्ण)
साठा क्षमता- 21, 500 दशलक्ष घनफूट
जिल्ह्यातील लाभ क्षेत्र – 70 हजार हेक्टर
लाभ – जिल्ह्यातील 175 गावे
धरणाची शंभरी – 51 वर्षात 11 वेळा

गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी
6 ऑक्टोबर 1973
26 सप्टेंबर 1976
29 सप्टेंबर 1980
11 ऑक्टोबर 1994
6 ऑक्टोबर 2004
2 ऑगस्ट 2005
23 सप्टेंबर 2006
15 सप्टेंबर 2007
17 सप्टेंबर 2019
16 सप्टेंबर 2020
30 सप्टेंबर 2021

भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत शहराचा रखडलेला विकास, भ्रष्टाचार व रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हेच मुद्दे ठरणार कळीचे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !