खुनाच्या गुन्ह्यात पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Accused of murder in Jalgaon Crime Branch जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात पसार झालेल्या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने अमळनेर शहरातून मुसक्या आवळलया आहेत. वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे (रा. भोईवाडा, अमळनेर) असे अटकेतील या आरोपीचे नाव आहे.

अभिवचन रजेवर येताच आरोपी पसार
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्हयात वसंत अहिरे यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना 5 जून रोजी आरोपी अहिरे यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी वसंत कारागृहात पुन्हा दाखल झाले नाही. त्यामुळे याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वसंत हा अमळनेरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले यांना मिळाल्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे या कर्मचार्‍यांनी आरोपी वसंत अहिरे यास अमळनेर शहरातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत शहराचा रखडलेला विकास, भ्रष्टाचार व रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हेच मुद्दे ठरणार कळीचे

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !