कार जाळून मागितली 20 लाखांची खंडणी : महिला आरोपी जाळ्यात
20 lakh Ransom Demanded For Burning Car : Woman Accused Trapped जळगाव : शहरातील कार जाळून 20 लाखांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोघांना यावल शहरातील बसस्थानकातून अटक करण्यात आली होती तर या प्रकरणात आता महिललाही अटक करण्यात आली. आशा लहासे (जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वरखेडच्या तरुण शेतकर्याचा शॉक लागून मृत्यू
दोन कार पेटवत मागितली खंडणी
साईविहार कॉलनीत दोन कार पेटविणार्या सुरेश रमेश लहासे व राजू समाधान कोळी या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लहासे याच्या पत्नीचा देखील यात सहभाग असल्याची माहिती समोर आल्याने तिला अटक करण्यात आली.

महिलेने लिहिल्या खंडणीच्या चिठ्ठ्या
आनंद पाटील व हरिश वरुळकर यांची कार पेटवून 10 लाखांची खंडणी मागितल्याच्या चिठ्ठ्या आशा लहासे हिने लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. लहासे याच्या सांगण्यावरुन समाधान कोळी याने 29 जून रोजी मध्यरात्री दोन कार पेटवल्या होत्या. सुरेश लहासे हा आनंद पाटील यांच्याच घरात भाडेकरू म्हणून वास्तव्याला होता. त्यानेच घर मालकाची कार पेटवण्याचे कारस्थान रचले होते तर आशा लहासे हिने धमक्यांच्या चिठ्ठ्या लिहल्या होत्या. यामुळे या महिलाचा सदर गुन्ह्यातील तपास निष्पन्न झाल्याने तिला अटक करण्यात आली.